
गोंदिया,दि.१ ः -रोजी हरित क्रांतीचे प्रणेते महानायक माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती कार्यक्रम कृषी दिन म्हणून सर्व कार्यालयात व गोंदियात सर्व तालुक्यात अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली .
महाराष्ट्र व भारताचे राजकारण गाजविणारे व आधुनिक महाराष्ट्र घडविणारे, मनमिळाऊ स्वभावाचे नेते म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्र व भारताचा राजकारणात आहे. ज्यांनी सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रिपद भुषविले व आधुनिक महाराष्ट्राचा पाया मजबुत रोवला,हरित क्रांती घडून घडवून भारताला अन्न धान्यांनी सुजलाम सुफलाम करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्याबरोबर पंचायत राज व्यवस्था आणून ज्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण घडवून आणले. शेतकऱ्यांमध्ये आपला नेता म्हणून ओळख निर्माण करणारा नेता श्री वसंतरावजी नाईक यांची ओळख आहे .
स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कुडवा चौक गोंदिया येथे वृक्ष वाटप व वृक्ष लागवड कार्यक्रमाद्वारे वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेने जयंती साजरी केली. सर्वप्रथम वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्ष वाटप व वृक्ष लागवड करण्यात आले. याप्रसंगी श्री बरईकर,सुरेश चौरागडे,संतोष डोंगरे,नारायण गायकवाड,इशु राव, तसेच संघटनेचे पदाधिकारी डॉ.बाबूसिंग राठोड (अध्यक्ष ), संजय राठोड, विलास राठोड (कोषाध्यक्ष) , प्रदीप राठोड (जिल्हा संघटक) , अशोक राठोड, सुनिल राठोड,.विनोद जाधव तसेच अन्य पदाधिकारी व समाज बांधवांच्या उपस्थितीत कोविड १९ च्या नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली .