
अध्यक्षपदी धनिराम हिडामी तर सचिव पदी दिलीप केरामी यांची निवड
कोरची ,दि.12ः तालुक्यातील 29 ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांची बेडगाव ग्रामपंचायत येथे बैठक पार पडली. या बैठकीत जि.प. सदस्य अनिल केरामी यांच्या अध्यक्षतेखाली कोरची तालुका सरपंच संघटनेची नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली. कोरची तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी टेमला ग्रामपंचायतचे सरपंच धनिराम हिडामी तर सचिव पदी बोदादंड ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलीप केरामी यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत संपूर्ण कार्यकारिणी गठित करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी बेडगाव ग्रामपंचायतचे सरपंच चेतन किरसान, उपाध्यक्ष प्रमेश्वर लोहंबरे, महिला उपाध्यक्ष कुंती हुपूंडी, सहसचिव अशोक गावतुरे, गणेश गावळे, सुनिता मडावी, कोडगुल क्षेत्र संघटक मोहन कुरचाम, कोरची क्षेत्र मोहन कुमरे, मसेली क्षेत्र सुनिल सयाम यांची निवड करण्यात आली आहे. तर जुने सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
तसेच नंदकिशोर वैरागडे, सियाराम हलामी, राजेश नैताम, प्रतापसिंह गजभिये, कोषाध्यक्ष विरेंद्र जांभुळकर, सदस्य राजाराम नैताम, सरील मडावी, विजय हिडामी, किशोर नरोटे, गागसाय मडावी, राहुल मलगाम, ममता सहारे, जिवन नुरूटी, बुधराम फुलकवर, सुमित्रा कोरचा, चैनुराम मडावी, इंदलसिंग कुमरे, कलावंता हलामी, गुलशन नैताम, सावजी बोगा, संतानू धिकोटी, रविता हलामी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.




