43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ चिखलणी करताना ट्रॅक्टर उलटून चालक ठार

चिखलणी करताना ट्रॅक्टर उलटून चालक ठार

0
261

blank

लाखांदूर,दि.20ः- धान रोवणीसाठी शेतात ट्रॅक्टरने चिखलणी करताना चिखलात फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या नादात ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मडेघाट शेतशिवारात घडली. संदिप आनंदराव ढोरे (२८) रा. कन्हाळगाव असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
संदिप सकाळच्या सुमारास मडेघाट शेतशिवारातील महादेव राऊत या शेतकर्‍याच्या शेतात धान रोवणीसाठी ट्रॅक्टरने चिखलणी काम करीत होता. चिखलणी करीत असताना अचानक शेतातील खोल चिखलात ट्रॅक्टर फसला. त्यावेळी मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरखाली चिखलात दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती जगदीश ढोरे व संदीप तुपटे यांना होताच त्यांनी गावकर्‍यांसह लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून लाखांदूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रदीप राऊत, पोलिस अंमलदार मनीष चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टर इंजिनखाली दबलेला मृतदेह गावकर्‍यांच्या मदतीने बाहेर काढला. घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे

blank