
गोंदिया- पाणी व स्वच्छता विभाग हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने या विभागाचे कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन यांनी गोंदिया जिल्ह्याच्या भेटी दरम्यान दिले.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या पाहणी व आढावा अनुषंगाने आज 20 जुलै रोजी त्यांनी गोंदिया जिल्ह्य़ातील अर्जुनी मोर तालुक्यातील ग्रामपंचायतीना भेटी देऊन विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेश राठोड, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग हितेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी राठोड, सडक अर्जुनी गटविकास अधिकारी खुणे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रहमतकर, आयईसी सल्लागार उखळकर, शालेय स्वच्छता सल्लागार रहांगडाले यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपसचिव महाजन यांनी सुरुवातीला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतीला भेट देऊन सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय तसेच वैयक्तिक शौचालय बांधकाम संदर्भात भेटी देऊन तपासणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय चान्ना येथे भेट देऊन रमा महिला ग्राम संघ मार्फत चालविण्यात येणाऱ्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे सदर गांडूळ खत प्रकल्प हे सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यान्वित झाल्याने गावातील महिलांना या निमित्ताने रोजगाराचे साधन उपलब्ध झाले याबाबत उपसचिव महाजन यांनी कौतुक करून त्याचप्रकारे ईतरही गावांत अशाप्रकारे प्रकल्प उभारून बचत गटाच्या महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
जिल्ह्यातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी तसेच सार्वजनिक शौचालयांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले





