33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ तक्रारदाराकडूनच मोकळ्या जागेवर अतिक्रमण,इर्री येथील प्रकार

तक्रारदाराकडूनच मोकळ्या जागेवर अतिक्रमण,इर्री येथील प्रकार

0
84

blank

ग्रामपंचायत प्रशासनाचा पाठिंबा.

गोंदिया ता.21 — मागच्या मार्च महिन्यात गोंदिया तालुक्यातील इर्री येथील एका गरीब शेतकऱ्याच्या शेतातील झोपडीवर अतिक्रमणाचा ठपका ठेवित ग्रामपंचायत प्रशासनाने ती झोपडी जमीनदोस्त केली. परंतु या मोकळ्या झालेल्या जागेवर या प्रकरणाचे तक्रारदार यांनीच आता अतिक्रमण केले असल्याची बाब समोर आली असून त्यास ग्रामपंचायत प्रशासन संपूर्ण मदत करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण त्वरित काढून ग्रामपंचायत प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी अन्यायग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे लावून धरली आहे.
येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांनी वीस वर्षांपूर्वी आपल्या शेतात झोपडी बांधून ते त्या झोपडीत आपल्या कुटुंबासमवेत निवास करीत होते. परंतु सदर झोपडी ही शासकीय जागेवर बांधली असल्याची तक्रार गावातील नागरिक हिरालाल दाजी ठकरेले यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कोणतीही चौकशी न करता ती झोपडी त्वरित जमीनदोस्त करण्याचे आदेश गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनास दिले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने ती झोपडी मागच्या मार्च महिन्यात जमीनदोस्त केली.व जागा मोकळी केली. परंतु आता या मोकळ्या झालेल्या जागेवर या प्रकरणाचे तक्रारदार दस्तुरखुद्द हिरालाल दाजी ठकरेले यांनीच अतिक्रमण केले असल्याने व त्यास ग्रामपंचायत प्रशासन संपूर्ण मदत करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामपंचायत प्रशासनान काळे फासत असल्याची बाब यावरून दिसून येत आहे. या संबंधात येथील उपसरपंच रवी तरोने यांना विचारले असता त्यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला आहे. मात्र येथील ग्रामसेवक वरठे यांना भ्रमणध्वनी केले असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.एकाचे गरीब शेतकऱ्याचे अतिक्रमण काढून ती जागा दुसऱ्याला देणे ही बाब अन्यायकारक असून ग्रामपंचायत प्रशासन या गैरप्रकाराला सर्वोत्तपरि मदत करीत असल्यामुळे सदर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर कडक कारवाई करून सदर हिरालाल दाजी ठकरेले यांनी केलेले गैर कायदेशीररित्या अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे अन्यथा त्या मोकळ्या जागेवर आपण आपल्या कुटुंबा समवेत आंदोलन करू असा इशारा अन्यायग्रस्त शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे व गावकऱ्यांनी जिल् हा प्रशासनास पाठवलेल्या पत्रातून केला आहे.
पी. एस. खोटेले प्रभारी गटविकास अधिकारी प. स. गोंदिया—सदर प्रकरणाची तक्रार अजून आली नाही. तक्रार आल्यावर निश्चित कारवाई करू.

blank