33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ प्रत्येक गावामध्ये कृषी गोदाम उभारणार-आमदार विनोद अग्रवाल

प्रत्येक गावामध्ये कृषी गोदाम उभारणार-आमदार विनोद अग्रवाल

0
36

blank

तांडा येथे २० लक्ष रुपयांचे मंजूर कृषी गोदामाचे भूमिपूजन संपन्न
गोंदिया : प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र नाहीत, धान विक्री करण्यासाठी शेतकरी बांधवाना आपल्या जवळच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर जावे लागते यासाठी आपले धान केंद्रावर न्यावयासाठी शेतकरी बांधवाना ५ ते १० हजार रुपयापर्यंत खर्च सुद्धा येतो. धान खरेदी केंद्रावर बरीच वेळ आपला नंबर येई पर्यंत शेतकरी बांधवाना वाट पहावी लागते. जर त्याचं दिवशी नंबर लागला नाही तर त्यांना आपले धान घेऊन परत घरी यावे लागते. हा त्रास पाहता प्रत्येक गावात कृषी गोदाम असल्यास शेतकऱ्यांची पायपीट थांबेल शेतकरी बांधवांचे पिक गावातल्या गावात खरेदी होईल तसेच एका मोठ्या आर्थिक भुर्दंडापासून देखील त्यांची सुटका होईल. सोबतच शेतकरी बांधवांच्या वेळेची देखील बचत होईल. आणि आपला नंबर येण्याची वाट शेतकरी बांधवाना पहावी लागणार नाही किंबहुना आज आपला नंबर लागला नाही तर घरी धान परत घेऊन येण्याची वेळ शेतकरी बांधवांवर येणार नाही आणि तो बेफिकर होऊन आपल्या घरी जाऊ शकेल. यामुळे कृषी गोदाम शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरेल असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला. ग्राम तांडा येथे २० लक्ष रुपये मंजूर असलेल्या कृषी गोदामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातला सर्वाधिक वर्ग हा ग्रामीण भागात राहतो. कोरोना काळात संपूर्ण देश थांबला पण शेतकरी मात्र थांबला नाही. कोरोना काळात सुद्धा बम्पर उत्पादन शेतकरी बांधवांनी घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा उचलला.  मात्र अद्यापही शेतकरी बांधवांच्या समस्या संपलेल्या नाहीत. यंदाच्या वर्षी शेतकरी बांधवांचे धान साठवण गोदाम फुल झाले असल्याने तसेच धानाची भरडाई झाली नसल्यामुळे धान गोदामातच पडून राहिल्या कारणास्तव विक्री करण्यास विलंब झाला होता. यामुळे शेतकरी बांधवाना त्रास सहन करावा लागला होता. यावर उपाय म्हणून प्रत्येक गावात धान साठवण गोदाम उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.  दरम्यान येत्या २ वर्षात ३० ते ३५ गावांमध्ये तसेच या पंचवार्षिक योजनेत माझ्या विधानसभेतील प्रत्येक गावात कृषी गोदाम उभारणार असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.
दरम्यान चाबी संघटनेचे अध्यक्ष भाऊराव उके, ग्रामीण अध्यक्ष छत्रपाल तुरकर, जेष्ठ नेते धनंजय जी तुरकर, महामंत्री सुजित येवले, माजी पं.स. सदस्य रामराजजि खरे, छगन माने, परसरामजी हुमें, योगेंद्र जी हरिनखेड़े,  युवा मोर्चा तर्फे विक्की बघेले तसेच मुनेश रहांगडाले सरपंच ग्राम पंचायत तांडा,चेतसींह परीहार उपसरपंच,एन.डी.अतकरे ग्रामसेवक, प्रमोद रहांगडाले ग्राम पंचायत सदस्य,मुलचंदजी बिसेन ग्राम पंचायत सदस्य,सौ.पुष्पाताई कटरे ग्राम पंचायत सदस्य,सौ.इंद्रायणी रहांगडाले माजी पं.स.सदस्या,हसनसींहजी सोमवंशी पो.पा.नारायणजी भगत माजी सरपंच,कु.रेखा बोरकर मॅडम , कैलाशसिंह चावडें,गेंदलाल रहांगडाले,रवी रहांगडाले,लीनेश रहांगडाले,रवी पंधरे (सरपंच अदासी),संजयजी टेंभुण्रीकर (उपसरपंच अदासी)शाम लांजेवार ग्राम पंचायत सदस्य अदासी,खेमनजी पुंडे, राजेंद्रं रहांगडाले,माधोरावजी पटले,संतोष पटेरीया ,शीलाताई खांडेकर,अनीता रहांगडाले,रोहीणी गौतम, यशोमती रहांगडाले,शैलु सोमवंशी,हेमलता सोमवंशी,आरती पवार पिल्लेवार सर(संचलन)डोनोडे मॅडम,खवडें मॅडम, प्यारेलाल रहांगडाले,महेश कटरे,दिपक बावणे,संजय सुरसाऊत,शालीकराम बावणथडें आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

blank