29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ रमाई आवास योजनेचे ब्लँकेट व शेगड्या 8 महिन्यापासून गोदामातच

रमाई आवास योजनेचे ब्लँकेट व शेगड्या 8 महिन्यापासून गोदामातच

0
43

blank

तिरोडा, दि.28 : तालुक्यातील ग्रामपंचायत घोगराच्या निष्काळजीपणाच्या धोरणामुळे मागील 8 महिन्यापासून रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ब्लँकेट व शेगड्या वाटप करण्यात आल्या नाही. त्या अद्यापही गोदामातच पडून आहेत.सविस्तर असे की, शासनाद्वारे गरजू लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. परंतु, अंतिम टोकावर काम करणार्‍या संस्था योग्यरित्या त्या क्रियांवित करीत नसल्यामुळे योजनांचा लाभ वेळेवर लाभार्थ्यांना मिळत नाही.

असाच एक प्रकरण तालुक्यातील घोगरा ग्रामपंचायतमध्ये दिसून येत आहे. शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत सन 2013-14 अंतर्गत मंजूर आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाद्वारे प्रदूषणमुक्त चुली व ब्लँकेट ग्रामपंचायतला देण्यात आले होते. हे साहित्य मागील 8 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या गोदामात धूळ खात आहेत. हे साहित्य उंदीर व मंजरी खराब करीत आहेत. पण ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत असून अद्याप लाभार्थ्यांना वाटप केले नाही. याबाबत सरपंच सरपंच प्रमिला भंडारकर व ग्रामसेवक भालाधरे यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

उल्लेखनीय म्हणजे शासनद्वारे लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी लाखो रुपयांचे साहित्य पाठविले जातात. परंतु काही निष्क्रिय अधिकारी व पदाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे समान-साहित्य खराब होते. तसेच जनतेच्या निधीचा दुरुपयोग होत असून लाभार्थ्यांना लाभही मिळत नाही. आता यावर वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

blank