41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ गोंदिया 0,भंडारा 1,अकोला 1,गडचिरोली 5,बुलडाणा 6, वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना...

गोंदिया 0,भंडारा 1,अकोला 1,गडचिरोली 5,बुलडाणा 6, वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित

0
44

blank

गोंदिया,दि.9 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 9 ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आज डिस्चार्ज रुग्णांची संख्या 2 आहे.आजपर्यंत 41,194 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,489 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 2 आहे. 1 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.3 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 661.8 दिवस आहे
१७९ अहवाल, एक पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.९- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १७९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७८ अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७९०(४३१९८+१४४१५+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.आज दिवसभरात एका जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही महिला रुग्ण असून अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे.आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एक, इन्फिनिटी हेल्थकेअर येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन तर होम आयसोलेशन मधील पाच असे दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित; २ जणांना डिस्चार्ज—मालेगाव : पिंपळा- १.जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली आहे.कोरोना बाधितांची सद्यस्थिती-एकूण पॉझिटिव्ह – ४१६७८,ऍक्टिव्ह – १७,डिस्चार्ज – ४१०२३,मृत्यू – ६३७….बुलडाणा आज पॉझिटिव्ह : 6,एकूण पॉझिटिव्ह : 87332,मृत्यू : 672,आतापर्यंत डिस्चार्ज :86600,आजचे डिस्चार्ज : 7

गडचिरोली जिल्ह्यात 5 नवीन कोरोना बाधित तर 9 जण कोरोनामुक्त

गडचिरोली,  दि.09 : आज जिल्हयात 5 नवीन कोरोना बाधित आढळून आले तसेच आज 09 जणांनी
कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30637
पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29858 वर पोहचली. तसेच सद्या 34 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 745 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे
होण्याचे प्रमाण 97.46 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.
नवीन 05 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 04, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड
तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा
तालुक्यातील बाधितामध्ये 00, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा
तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त
झालेल्या 09 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 01, अहेरी 03, आरमोरी 01, भामरागड 00, चामोर्शी 01, धानोरा 00,
एटापल्ली 00, मुलचेरा 02, सिरोंचा 01, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

भंडारा, दि.09:- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. आज 25 व्यक्तींची चाचणी केली असता एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हीटी रेट 0.4 टक्के आहे. जिल्ह्यात आता 01 सक्रिय रुग्ण आहेत.आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58676 झाली आहे. आज एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59810 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 40 हजार 965 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59810 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 01, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58676 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59810 झाली असून 01 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

blank