
गोरेगाव-शेतीमध्ये नवनविन बदल होत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानचापर केला जात आहे. कमी खर्चात किफायतशीर शेती कशी करता येईल, यावर शासन व संशोधक भर देत आहेत. शाश्वत शेती व अधिक उत्पन्नासाठी द्रवरूपी इफको नॅनो युरिया हे गोंदिया ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड गोरेगाव येथे पहिल्यांदाच उपलब्ध झाले असून शेतकर्यांनी त्याचा उपयोग करावा, असे आवाहन भाजप नेते रेखलाल टेंभरे यांनी केले.
ते गोरेगाव येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे टेंभरे म्हणाले, नॅनो युरिया हा नत्राचा स्त्रोत आहे. पिकांची योग्य वाढ आणि विकासासाठी एक पोषक घटक आहे. जगात नॅनो युरिया हा प्रथम इफको नॅनो तंत्रज्ञान गुजरात राज्यातील कलोले संशोधन संस्थेले विकसित केलेला आहे. संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या पिकांवर घेण्यात आलेल्या चाचण्यांनुसार त्यातील पोषक घटक पिकांना आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नॅनो युरियाच्या वापरामुळे पारंपारिक नत्रयुक्त खतांच्या वापर 50 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो. पारंपारिक पद्धतीने दिल्या जाणार्या युरिया खतामधील फक्त 30 ते 50 टक्के नत्र हे पिकांना उपलब्ध होते. उर्वरित नत्र वायूरूपात हवेत विरघळतो. दाणेदार युरिया जमिन, हवा व पाणी प्रदूषित करते, म्हणून शेतकर्यांनी द्रवरूपी इफको नॅनो युरियाचा वापर करावा असे आवाहन टेंभरे यांनी केले.





