
- भिवरामजी विद्यालयातील 18 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त
तिरोडा : गरीब व होतकरू विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढावी. त्यांच्या शैक्षणिक जीवनात सुधारणा व्हावी. या हेतूने महाराष्ट्र राज्य परिषदेद्वारे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा (National Means Cum-Merit Scholarship) (NMMS) घेतली जाते. या परीक्षेचे आयोजन आठव्या वर्गात केले जाते. सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात तालुक्यातील ग्राम वडेगाव येथील भिवरामजी विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी आर्यन बेनिराम पटले याने गोंदिया जिल्ह्यातून अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. सदर विद्यालयातील एकूण 24 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत