40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ तिरोडा तालुक्यातील केसलवाडा येथे राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचे आयोजन

तिरोडा तालुक्यातील केसलवाडा येथे राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचे आयोजन

0
45

तिरोडा,दि.09ः केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रीय पोषण महिना 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशात राबविण्यात येत असून अंगणवाडी केंद्र केसलवाडा बीट मुरमाडी प्रकल्प तिरोडा येथे राष्ट्रीय पोषण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली व 0 ते 6 वयोगटातील बालकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच SAM बालकांचे एसी डीसी चे आयोजन करण्याबाबत ठरविण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर,बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोदकुमार चौधरी,स्त्री व बाल रोग तज्ञ डॉ.नीरज गुप्ता यांनी सर्व लाभार्थ्यांना पोषण महिन्याचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत केसलवाडा सरपंच श्रीमती कुकडे होत्या.पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व उपकेंद्राचे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर विनोद जाधव,विस्तार अधिकारी साजन दादूरिया, गट समन्वयक तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका व समस्त गावकरी या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती वंदना जाते यांनी केली.कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका रिता शहारे तर आभार प्रदर्शन ललिता पटले अंगणवाडी सेविका यांनी मानले.