गोरेवाड्यात ‘ली’ व ‘राजकुमार’ यांना एकत्र पाहण्याची संधी

0
48

नागपूर-बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, नागपूर येथील इंडियन सफारीच्या व्याघ्र सफारीमध्ये पर्यटकांना ह्यली व ह्यराजकुमार या दोन वाघांना एकत्र पाहण्याची संधी पर्यटकांना लाभणार आहे. ८ स्पटेंबर रोजी या दोन वाघांना पहिल्यांदाच एकत्र सोडण्यात आले.
सदर दोन्ही वाघांची एकमेकांसोबत अनुरूपता पाहून सदर दोन्ही बाघ सोबत राहणार, याची शहानिशा करून त्यांना इंडियन सफारीच्या व्याघ्र सफारीमध्ये एकत्र सोडण्यात आले.
त्यामुळे आता पर्यटकांना सफारीमध्ये दोन वाघ दिसण्याची शक्यता वाढलेली आहे. ‘ली’ व ‘राजकुमार’ यांना एकत्र करण्यासाठी वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक डॉ.धूत आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे डॉ. मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण संस्था, गोरवाडा येथील विशेषतज्ञ डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजित कोलगथ, डॉ. ए. एस. शालिनी व नागपूरचे डॉ. सय्यद बिलाल प्रामुख्याने उपस्थित होते.
विभागीय व्यवस्थापक, गोरवाडा प्रकल्प, नागपूर व इतर वन अधिकार्‍यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीमध्ये सदर दोन्ही वाघांना इंडियन सफारीच्या व्याघ्र सफारीमध्ये एकत्र सोडण्यात आले. ‘ली’ व ‘राजकुमार’ यांना एकत्र करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, संचालक, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण संस्था डॉ. शिरीष उपाध्ये यांचे सातत्याने मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे विभागीय व्यवस्थापक गोरेवाडा प्रकल्प पी.बी. पंचभाई यांनी कळविले आहे