33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय भाजयुमोची नियोजन विषयक बैठक उत्साहात

भाजयुमोची नियोजन विषयक बैठक उत्साहात

0
48

blank

गोंदिया- स्थानिक खासदार जनसंपर्क कार्यालयात 12 सप्टेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चाची नियोजन विषयक बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेश प्रभारी तथा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्हा दौर्‍याचे नियोजन व संगठन विषयक आढावा घेण्यात आला. गाव तिथे युवा मोर्चा शाखा गठन करणे तसेच संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे होते. प्रमुख उपस्थितीत भाजप जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, जिल्हा महामंत्री ललित मानकर, महामंत्री हर्ष मोदी, रूपेश कुथे, संदीप रहांगडाले, मोलिंद सेवाळे, गुड्डू चांदवानी, पारस पुरोहित, गौरेश बावनकर, अंशुल बिसेन, तिजेश गौतम, बाला वहिले, अमोल तितरमारे, विवेक खंडायत, विलाश बगड़कर, इंद्रजीत भाटिया, देवराम चुटे, दिशांत चन्ने, विवेक चौधरी, रवि ठकरानी, पूरु ठाकरे, कौशल ठाकूर, पलाश लालवानी, रवि मुटकुरे, शिशुपाल राहंगडाले यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष उपस्थित होते.

blank