गोंदियात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे राज्य अधिवेशन

0
47

गोंदिया-महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाचे 12 वे राज्य अधिवेशन गोंदियात 11 व 12 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे. जिल्हाध्यक्ष चत्रुघन लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन आयोजनासंदर्भात बैठक पार पडली.  सभेत राज्य संघटन सचिव मिलिंद गणवीर यांनी राज्य अधिवेशनाचे आयोजनाचे महत्व व अधिवेशनाच्या मुख्य पाहुणे व वक्ते म्हणून आयटकच्या राष्ट्रीय महासचिव अमरजित कौर यांना आंमत्रित करण्यातचे सांगितले.
यावेळी अधिवेशनाच्या यशस्वतेसाठी 4 व्यवस्थापन समित्यांचे गठन करण्यात आले. यात विष्णू हत्तीमारे यांच्याकडे भोजन समिती, राजेश भोकासे यांना सजावट समिती, दिप्ती राणे व सुनिता ठाकरे महिला समिती, महेंद्र कटरे प्रचार प्रसार समितीची जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान सुखदेव शहारे तथा आशिष उरकुड़े यांनी राज्य कार्यकारिणीच्या कामकाजाचा अहवाल मांडून महासंघाच्या राज्यभर चाललेल्या मोहिमा व मंत्रालयात चाललेल्या चर्चेची माहिती दिली. सभेला रविंद्र किटे, महेंद्र भोयर, बुधराम बोपचे, खोजराम दरवडे, विनोद शहारे, धनेश्वर जमईवार, उत्तम डोंगरे, निलेश मस्के, रमेश प्रधान, मुकेश कापगते, खुशाल बनकर, सुनिल लिल्हारे, किशोर नागपुरे, माणिक शहारे, मंगला बिसेन, दिनेश झोडे, माणिक ऊके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.