
संतोष रोकडे/अर्जुनी मोरगाव,दि.22ः- तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पथदिवे गेल्या तीन महिन्यापासून बंद आहेत. पावसाळ्याच्या दिवसात पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.यासंबंधी प्रशासनाला वेळोवेळी पथदिवे सुरु करण्याची मागणी संबंधित ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आली.शासनाने थकीत बिलांचा महावितरण कंपनीला भरणा केला नाही परिणामी ग्रामपंचायतीचे पथदिवे वीजपुरवठा खंडित करण्यात आला.नागरिकांना सणासुदीच्या दिवसात अंधारात राहावे लागले.यासंदर्भात राज्य सरकार,लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार निवेदने सादर करण्यात आली. थकीत बिलांच्या भरणा करण्याची मागणी करण्यात आली.मात्र तीन महिने लोटूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे ग्रामपंचायत सरपंच सेवा संघ तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 23 सप्टेंबरला आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.या संदर्भाचे निवेदन तहसीलदार विनोद मेश्राम,ठाणेदार सतीश जाधव, गटविकास अधिकारी निमजे, आम.चंद्रिकापुरे जनसंपर्क कार्यालयाचे आर.के.जांभुळकर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे,सरचिटणीस अशोक कापगते,संजय खरवडे,प्रकाश शिवणकर,होमराज पुस्तोडे,डॉ.दीपक रहिले,भोजराम लोगडे,युवराज तरोने,कुंदा डोंगरवार,किशोर ब्राम्हणकर, विश्वनाथ बाळबुद्धे, लिलेश्वर खुणे आणि सरपंच सेवा संघाचे सरपंच उपस्थित होते.





