
सडक अर्जुनी,दि.23ः- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी जनणनेसह विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांच्यामार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.निवेदनात महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समिती पोटनिवडणुका आगामी काळात होत असून होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी संवर्गाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. तसेच भारतीय संविधानाच्या कलम 243(डी -6) आणि कलम 243(टी -6) सुधारणा(अमेडमेंट ) करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका,नगर परिषद, नगरपंचायत मध्ये ओबीसी संवर्गाला 27% आरक्षण राहील अशी तरतूद करण्यात यावे या मागणीचा समावेश आहे.याप्रसंगी अशोक लंजे, मधुसूदन दोनोडे, किशोर भाऊ शेंडे, रोशन शिवणकर, अश्लेष माडे, उज्वल चौधरी, वेद परसोडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्जुनी मोरगावातही दिले ओबीसींचे निवेदन
अर्जुनी मोरगाव-निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक आयोग घेत आहे.भविष्यात ओबीसी आरक्षण संपवण्याच्या राजकीय डाव आहे ओबीसी आरक्षण स्पष्ट झाल्याशिवाय आयोगाने निवडणूका घेऊ नये.या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने नायब तहसीलदार देशमुख यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान,गृहमंत्री आणि राजकीय नेत्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ विदर्भ उपाध्यक्ष आशीष कापगते,महेश लंजे, मीनल बहेकार,छत्रपाल कापगते,घनश्याम सोनवाने, अश्विनसिंह गौतम,प्रणय शेंडे, नंदकिशोर गहाणे, प्रदीप नाकाडे,जितेंद्र हातझाडे उपस्थित होते.





