
गोंदिया,दि.25 : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरीता व त्यांच्या समस्यांचे
निराकरण करण्याकरीता 27 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालय कारंजा (गोंदिया)
येथील प्रेरणा सभागृहात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन
करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी
आपल्या समस्या/निवेदन/तक्रारी लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे संबंधीत
विभागाकडे सादर करावे. जनता दरबार कार्यक्रमासाठी नागरिकांच्या तक्रारी/निवेदन घेण्यासाठी
सुट्टीच्या दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर शनिवार व 26 सप्टेंबर रविवार या दिवशी सुध्दा संबंधीत
विभाग कार्यरत राहणार आहेत.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी 27 सप्टेंबर रोजी गोंदिया येथे आयोजित जनता दरबारात
कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.





