
गोंदिया • आज 00 रूग्णाला डिस्चार्ज
• #कोरोना पॉझिटिव्ह 00
• बरे झालेले रुग्ण 40509
• एकूण पॉझिटिव्ह 41220
• क्रियाशील रुग्ण 04
• आज 00 मृत्यू
• एकूण मृत्यू 576
• रिकव्हरी रेट 98.6 टक्के
• मृत्यू दर 01.40
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक
भंडारा,दि.27:- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या शून्य आहे. आज 29 व्यक्तींची चाचणी केली असता 01 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 02 सक्रिय रुग्ण आहे.आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58959 झाली आहे. आज एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60094 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 60 हजार 359 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60094 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 01, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58959 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60094 झाली असून 02 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.88 टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात 288 तपासण्यांपैकी कोरोना बाधितांची संख्या निरंक तर 2 कोरोनामुक्त
गडचिरोली,दि.27 : आज गडचिरोली जिल्हयात 288 कोरोना तपासण्यांपैकी नविन कोरोनाबाधितांची
संख्या निरंक तर 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील
आत्तापर्यंत बाधित 30773 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30008 आहे. तसेच सद्या 19 सक्रिय कोरोना बाधितांवर
उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे
जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.06 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला.कोरोनामुक्त झालेल्या मध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.
बुलडाणा–आज पॉझिटिव्ह : 2,एकूण पॉझिटिव्ह : 87564,मृत्यू : 673,आतापर्यंत डिस्चार्ज :86874,आजचे डिस्चार्ज : 5





