36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ पक्का रस्ता बांधकामासाठी तिन गावांतील नागरिकांचे आंदोलन

पक्का रस्ता बांधकामासाठी तिन गावांतील नागरिकांचे आंदोलन

0
35

blank

– आमदरांच्या मध्यस्थिने आंदोलन मागे

गोंदिया-शहरा जवळील नंगपुरा मुर्री, चुटीया आणि पांगडी या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहन जात असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. येथे रोज अपघाताच्या घटना घडत आहेत. या मार्गाचे पक्के बांधकाम करण्यात यावे, जड वाहनांना रात्री 9 ते सकाळी 6 ही वेळ ठरवून देण्यात यावी, या मागण्यांसाठी आज शुक्रवार 8 ऑक्टोबर रोजी आंदोलन पुकारले होते. दरम्यान आमदार विनेद अग्रवाल यांनी मध्यस्थी करून अधिकार्‍यांशी चर्चा करून वरील समस्यवेर तत्काळ उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.
नंगपुरा मुर्री, चुटीया, पांगडी मार्गावर मार्गावर राईस मिल आहेत. भारतीय खाद्यान्न निगमचे गोदाम देखील आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड, अवजड वाहनांची प्रचुड वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची ठिकठिकाणी प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गाचे पक्के बांधकाम करण्यात यावे, जड वाहनांना रात्री 9 ते सकाळी 6 ही वेळ ठरवून देण्यात यावी, या मागणीचे निवेदन वरील तीनही ग्रामपंचायतींनी खासदार प्रफुल्ल पटेल यांना देत मागणीवर अंमल न झाल्यास 8 ऑक्टोबरपासून वाहतूक रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. या अनुशंगाने आज वरील तिन्ही गावातील ग्रापं पदाधिकारी, ग्रामस्थांनी रस्ता अडवून धरत आंदोलन पुकारले. सदर बाब आ. विनोद अग्रवाल यांना माहित होताच त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
दरम्यान अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वाहतुक पोलिस अधिकारी यांच्याशी चर्चा करून वरील समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास सांगीतले. यावेळी माजी जिप. सभापती शैलजा सोनवाने, दीपा चंद्रिकापुरे , सरपंच ओमप्रकाश रहांगडाले, अजीत टेंभरे, कमलेश सोनवाने, मोहन गौतम, तीर्थराज रहांगडाले, सुधीर चंद्रिकापुरे, राजेश कोल्हे, राजकुमार टेकाम, मिना सुर्यवंशी, कुंदा रिनायत, जामती बेदी, कुंदा दास, राधेशाम शरणागत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

blank