34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन देशासाठी कार्य करण्याची गरज

महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन देशासाठी कार्य करण्याची गरज

0
28

blank

 देसाईगंज–समाजाच्या उत्थानासाठी भारत देशातील संत व महापुरूषांनी प्रयत्न केले असून, आता तरूणांना देशासाठी मरण्याची गरज नसून प्रत्येकांनी देशासाठी रक्तदान, देहदान, नेत्रदान यासारखे कार्य करण्याची गरज आहे. महापुरुषांची जयंती साजरी करताना महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन देशासाठी कार्य करण्याची आता खरी गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजरीवादक तुषार सुर्यवंशी यांनी केले.
तालुक्यातील तुळशी येथील धम्मदीप बुद्ध विहाराच्या प्रांगणात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कोरोना जनजागृती अनुषंगाने जाहीर कीर्तन प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद््घाटन तालुका कॉंग्रेस कमिटीेच अध्यक्ष परसराम टिकले यांनी केले. अध्यक्षस्थानी जलसंधारण उपविभाग अहेरीचे अभियंता नुबिर फुले होते. कार्यक्रमाला आरमोरीचे भाग्यवान खोब्रागडे, तालुका कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नितीन राऊत, प्रा. दुधे, दौलत धोटे, विजय लोणारे, दिलीप रामटेके, सोमाजी मेर्शाम, सुभाष लोणारे, सरपंच चक्रधर नाकाडे, उपसरपंच सुरेश तोंडफोडे, पो.पा. तेजस्विनी दुनेदार, ग्रा.पं. सदस्य गुणाजी वझाडे, सचिन रामटेके, सुमन रामटेके आदी उपस्थित होते.
तुषार सूर्यवंशी प्रबोधनातून पुढे म्हणाले, बसताना असे बसा की इतर लोकांनी आपल्याला बसायला जागा दिली पाहिजे. चालतना असे चाला की समोरच्याने आपल्याला रस्ता दिला पाहिले आणि मरताना असे मरा की जर आपण मेलो तर त्यांच्या डोळय़ात दोन थेंब पाणी आले पाहिजे.
यावेळी धम्मदीप बुद्ध विहाराचे मावळते अध्यक्ष अशोक गजभिये यांचा तुषार सुर्यवंशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन मंडळाच्यावतीने सत्कार केला. संचालन व आभार विष्णू दुनेदार यांनी केले.

blank