31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

0
32

blank

गडचिरोली,दि.10: भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे कडून दिनांक ०१ जानेवारी, २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून ज्यांचे वय दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजी १८ किंवा अधिक असेल त्यांना दिनांक ३० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत नमुना अर्ज क्रमांक ६ भरून नाव नोंदणी करण्यात येणार आहे.  नाव नोंदवताना वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड ईत्यादी यापैकी कोणताही एक दस्तावेज असणे आवश्यक आहे. तसेच निवासाच्या पुराव्यासाठी बँक/टपाल यांचे चालू खातेपुस्तक, भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन चालक परवाना ईत्यादी यापैकी कोणताही एक दस्तावेज असणे आवश्यक आहे. जर एखाद्या मतदाराला किंवा मतदाराचे नाव वगळायचे असेल तर त्यांना नमुना अर्ज क्रमांक ७ भरून त्यासंबंधीतचे कागदपत्रासह संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी कार्यालयात भरू शकेल. जर एखाद्या मतदाराला आपले नांव मतदार संघामध्ये/तालुक्यामध्ये (यादी भाग क्रमांक) नाव बदलवायचे असल्यास असेल तर त्यांना नमुना अर्ज क्रमांक ८ किंवा ८ अ भरून त्यासंबंधीतचे कागदपत्रासह संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी कार्यालयात भरू शकेल.

नाव नोंदणी/वगळणीच्या सुविधा : मतदार नाव नोंदणीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. ऑफलाईन अर्ज हे संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी कार्यालयात उपलब्ध आहेत.  तसेच पुढील ऑनलाइन संकेतस्थळाचा किंवा ॲप चा वापर करून मतदार नोंदणी करीता अर्ज करू शकता. National Voter Service Portal (www.nvsp.in),  Voter Portal Beta (https://voterportal.eci.gov.in/), Voters Helpline App (VHA) मोबाइल अॅप, संबंधित मतदार नोंदणी कार्यालय.

दिनांक  ३० नोव्हेंबर, २०२१ दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी असून सदरच्या मतदार यादी दिनांक ०५ जानेवारी, २०२२ रोजी प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

दिव्यांग मतदारांसाठी सुविधा : मा. भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी PWD या ॲपची सोय केलेली आहे.  सदरचे ॲप ॲड्राईड मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून डाऊनलोड करता येईल.  या ॲपवरून दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता यईल.  तसेच त्यांनी आधी नोंदणी केली असेल पण दिव्यांगत्व म्हणून नोंद केली नसेल, अशा व्यक्तींनाही या ॲपवरून त्यांच दिव्यांगत्व चिन्हांकीत करता येईल.

तृतीयपंती मतदारांसाठी मतदार नोंदणी :तृतीयपंती करीता आता वय-निवास यांच्या कागदपत्राची आवश्यकता नसून फक्त प्रतिज्ञापत्राची आवश्यकता आहे. सदरचे प्रतिज्ञापत्र संबंधीत मतदारा  नोंदणी कार्यलयात सादर करण्यात येईल.

मतदार नोंदणी करीता विशेष मोहिम : जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्याचे दृष्टीकोणातून दिनांक १३ नोव्हेंबर, १४  नोव्हेंबर, २७ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर  २०२१ रोजी विशेष मोहिमांचा कालावधी असणार आहे.  त्यामध्ये संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे त्यांचे मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी संबंधाने दावे व हरकती स्विकारण्याचे काम करणार आहेत.

विशेष ग्रामसभा :  विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गावातील नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी व नविन मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये मतदार यादीच्या चावडी वाचनाचा उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात येत होती. तथापि, आता हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा याकरीता संपुर्ण राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये दिनांक १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  तरी सदरच्या ग्रामसभेकरीता सर्व नागरीकांनी उपस्थित राहावे.

            तरी जिल्हा प्रशासनाकडून असे आवाहन करण्यात येते की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता जास्तीज जास्त पात्र मतदारांनी आपले नांव मतदार यादीत नोंदविण्यात यावे.  कुणाही पात्र मतदार आपले मतदार यादीत नांव नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये.

ग्रामपंचायत निवडणूक :   दिनांक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकुण १२७ ग्रामपंचायतीमध्ये २७८ रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी दिनांक १८ फेब्रुवारी, २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.  पंरतु कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन सदरची यादी रद्द करण्यात आली आहे.  आता नव्याने दिनांक ३१ ऑक्टोंबर, २०२१ पर्यंत रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम दिनांक १२ नोव्हेंबर,२०२१ ते १८ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत राबविण्यात येत आहे.  दिनांक १२ नोव्हेंबर, २०२१ ते १६ नोव्हेंबर, २०२१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचे निराकरन करून दिनांक १८ नोव्हेंबर, २०२१  ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले. तसेच यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती विजया जाधव व अव्वल कारकून आशिष  सोरते, किशोर मडावी, अर्चना दुधबवारे, विवेक दुधबळे, दीपक लाकूडवाहे यांची उपस्थिती या पत्रकार परिषदेत होती.

blank