31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जैन कलार समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा साजरा

जैन कलार समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा साजरा

0
62

blank

गोंदिया- जैन कलार समाज जिल्हा गोंदियाच्या वतीने भगवान सहस्रबाहू जयंती व उपवर- वधू परिचय मेळावा १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता जैन कलार समाज सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात १0५ उपवर- वधुं सह पालकांनी हजेरी लावली व आपल्या पाल्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर होते. विशेष अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोरलीकर, जैन कलार समाज अध्यक्ष एल.यु.खोब्रागडे, सचिव शालिकराम लिचडे, उपाध्यक्ष शोभेलाल दहीकर, कोषाध्यक्ष तेजराम मोरघडे, फुलचूरचे सरपंच मिलन रामटेक्कर, समाज सेवक हरिराम भांडारकर, मोहन रामटेक्कर व प्राचार्य प्रल्हाद हरडे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात कलार समाजाचे आराध्य दैवत राज राजेश्‍वर भगवान सहस्त्रार्जुन व माता जैनादेवी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली. दरम्यान दान दाते परमेश्‍वर लिचडे, सुखराम हरडे, शालीकराम लिचडे यांच्या हस्ते सभागृहाच्यावरील खोलींचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच याप्रसंगी वर वधू परिचय पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकातून समाजाचे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे यांनी सविस्तर रुपरेखा विशद करून समाजाच्या वाटचाली बाबद माहीती दिली व समाज कार्यकारी मंडळाचे, सभासद मान्यवरांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, लांजी व बालाघाट जिल्ह्यातील उपवर वधू यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे संचालन पुष्षा भांडारकर, आभार चंद्रशेखर लिचडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारी मंडळाचे कार्यकर्ते सचिव शालीकराम लिचडे, तेजराम मोरघडे, शोभेलाल दहिकर, सुखराम हरडे, यशोधराताई सोनवाने, विणाताई सोनवाने, वषार्ताई तिडके, हर्षा आष्टीकर, चेतना रामटेक्कर, मनिाक्षी रहमतकर, मनोजकुमार किरणापूरे, राजकुमार पेशने, रोशन दहिकर, योगेश ईटानकर यांच्यासह समाज बांधवांनी पर्शिम घेतले.

blank