
गोंदिया-जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज ३ डिसेंबर रोजी 16 नामांकन अर्ज दाखल झाले. यात जिप गणासाठी ७ तर पंस गणासाठी ९ नामांकनांचा समावेश आहे. गोंदिया तहसील अंतर्गत जिल्हा परिषदेसाठी 2, सालेकसा 1, तिरोडा 2, देवरी 1 आणि अर्जुनी मोरगाव 1 अशा सात नामांकनाचा समावेश आहे. पंचायत समितीसाठी गोंदिया तहसील 4, तिरोडा 2, अर्जुनी मोरगाव 3 उमेदवारांनी नामांकन दाखल झाले आहेत.
नामांकन दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. रविवारी शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारांना आता शनिवार आणि सोमवारीच अर्ज भरता येणार आहेत. यामध्ये बहुतांश उमेदवारांकडून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अद्यापपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही, त्यामुळे सोमवारीच सर्व पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार बोलले जात आहे.




