
गोंदिया :- संविधान मैत्री संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, सर्वसमाज ओबीसी मंच, मराठा सेवा संघ, आम्ही सिद्ध लेखिका, रानी दुर्गावती आदिवासी महिला मंडळ, बिरसा क्रांति दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिति व समस्त गोंदिया जिल्हा युनिटच्या संयुक्त विद्ममाने थोर समाजसुधारक, संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम सिव्हिल लाईन , गोंदिया परिसरात सविताताई बेदरकर (भुरले) यांच्या निवासस्थानी सर्वसमाज वर्गाच्या वतीने साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र ही संतांची व महापुरुषांची भुमी असून संत , समाजसुधारक हे जन्माने जरी एका विशिष्ट जातीचे असले तरी कार्य , कर्म व विचारांने ते सकल समाजाचे असतात. त्यांचे कार्य हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे असते. त्यामुळे त्यांची जयंती ही समाजातील सर्व घटकांनी साजरी करुन त्यांचे मानव उद्धाराचे विचार सर्व जाती-धर्मियांत पेरले गेले पाहिजे व मानव कल्याण साध्य केला पाहिजे. या उदात्त हेतूने संत तुकाराम महाराजांचे शिष्य, त्यांचे विचार अभंगगाथा व पोथीच्या स्वरूपात लिहणारे व तुकाराम महाराजांचे मानव कल्याणकारी अभंग जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती गोंदिया येथील एससी , एसटी, ओबीसी सर्वसमाजाने उत्साहात साजरी केली. तसेच महापुरुषांच्या विचारांना जातीच्या बंधनातून मुक्त करून समाजातील सर्व घटकांपर्यंत नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
सर्वप्रथम संत जगनाड़े महाराज यांच्या छायाचित्रा समोर दिप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले। या प्रसंगी आयोजक मंडळ संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलाश भेलावे, जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघतर्फे सविता बेदरकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमित धावळे, सर्वसमाज ओबीसी मंचतर्फे तीर्थराज ऊके, युवा बहुजन मंच तर्फे सुनील भोंगाडे, रवि भंडारकर, आदेश गणवीर, आम्ही सिद्ध लेखिकातर्फे प्रा.डॉ. दिशा गेडाम, यशोधरा सोनेवाणे, भारती किरनापुरे, शालू कृपाले, बिरसा क्रांति दलाच्या मालती किन्नाके, हेमलता आहाके, रानी दुर्गावती महिला मंडळ च्या शोभा कुसराम, अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघाचे तिलक दिप, भारतीय बौध्द महासभेच्या लक्ष्मी राऊत, एनएनबीवाय चे विश्वजीत बागड़े, अविनाश गोंदोके, वर्षा भंडारकर, सुनीता भेलावे, रीना भोंगाड़े, प्रिया सोनवाने, कु.प्रीति जेंगठे, कु.साक्षी भेलावे, गौरव बिसेन, डी.वाय.खोब्रागडे, एएपीचे मिलन चौधरी आदि प्रामुख्याने उपस्थित होते.





