
विनोद सुरसावंत/ ककोडी दि.25ः-. देवरी तालुक्यातील ककोडी आदिवासी सोसायटीच्या माध्यमातून सध्या शेतकर्यांच्या धानाची खरेदी सुरू असून या केंद्रावर १४ ते १५ लहानमोठे गावांचा समावेश आहे.त्यामुळे धान विक्रीसाठी मोठी गर्दी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.शेतकर्याना आपले धान केंद्रावर विकण्यास अडचण निर्माण होत असल्याने ही अडचण दुर व्हावी म्हणून प्रत्येक गावाला दोन दिवस देण्यात आले.मात्र या संस्थेच्या एका सदस्यांने आपली मनमर्जी सुरु करुन रात्री बेरात्रीला धान केंद्रावर धानाची खरेदी करीत असल्याचा प्रकार 23 डिसेंबरला उघडकीस आले.
संस्थेचे अध्यक्ष घेऊन 13 सदस्यीय समिती आहे.परंतु एकच सदस्य आपल्या मनमर्जीपध्दतीने काम चालवित असून उर्वरित सदस्य कुठे गेले व काय करतात हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर सदस्य आपल्या उपस्थितीत नेहमी रात्री अपरात्री मध्ये धान खरेदी केंद्रावर सरकारी सबंधित कर्मचारी नसताना आपल्या सबंधित लोकांचा धान घरुन मागवितो. तो धानाच्या बोरीचे काटा न करता सरळ शेतकर्यांच्या झालेल्या खरेदी करून रचलेल्या थप्पीत ठेवतो. असा गोरख धंदा नेहमीच रात्री अपरात्री चालू असते.
शासनाच्या नियमानुसार सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत केंद्रावर आलेल्या शेतकर्यांच्या धानाची खरेदी होते.हि गोष्ट माजी पोलीस पाटील आणि राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ता चंद्रपाल सहारे,अमरदास सोनबोईर आणि विनोद सुरसावंत यांचा लक्षात आल्यावर त्यांनी S. R. M यांना तत्काळ दि० २३/१२/२०२१. रात्री १०.०० वाजेच्या सुमारास मोबाईलवर सबंधित घटनेची माहीती दिली.त्यांनी योग्य कार्यवाही करतो म्हणून सागितले.तसेच रात्रीला सोसायटीचे अध्यक्ष,सचिवांनाही मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करुन माहिती देण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.यावरुन हे सर्व मिळुन क्षेत्रातील शेतकर्यांची दिशाभूल आणि लुटमार करीत असून मानसिक आणि शारिरिक त्रास देत असल्याचे आरोप शेतकरी बांधवानी केले आहेत.तसेच प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.




