34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ परसटोला येथे भीमा कोरेगाव लढ्यातील शुराना अभिवादन

परसटोला येथे भीमा कोरेगाव लढ्यातील शुराना अभिवादन

0
35

अर्जुनी मोरगाव,दि.03- भीमा कोरेगाव लढ्यातील पाचशे शुरविरांना अभिवादन करून त्यांच्या पावन स्मृतींना उजाळा देण्यासाठी तालुक्यातील परसटोला येथे सिद्धार्थ फाउंडेशन ने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. परिसरातील रक्तदात्यांनी आयोजकांच्या आवाहनाला मान देत सव्वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
भीमा कोरेगावची क्रांती ही भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहे.या लढ्यामध्ये 500 शूर वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देत भीमा कोरेगाव हा लढा अजरामर केला.या सूरविरांना आदरांजली म्हणून ” सिद्धार्थ युथ फाउंडेशन परसटोला” तर्फे “भव्य रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले.या शिबिरात 26 रक्तदात्यांनी रक्तदान करून शुराना अभिवादन केले.यावेळी नागपूर येथील रेंम्बो ब्लड अँड कम्पोनंत बँक च्या चमूने रक्तसंचलनाचे प्रक्रिया पूर्ण केली.शिबिराच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र रामटेके, विधु तिरपुडे,कमलेश वाघमारे,सुशिल खोब्रागडे,सचिन खोब्रागडे,शुभम खोब्रागडे, आशिष रामटेके,मिलिंद साखरे,कुलदीप साखरे,विपील डोंगरे,दिक्ष्यांत शाहारे आदींनी परिश्रम घेतले

blank