
भंडारा, दि. 8 : जिल्ह्यात शनिवारी 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.8) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 02 आहे. शनिवारी 928 व्यक्तींची चाचणी केली असता 51 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 124 सक्रिय रुग्ण आहे.
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58977 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60235 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.00 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 90 हजार 413 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60235 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 23, मोहाडी 04, तुमसर 14, पवनी 02, लाखनी 07, साकोली 01 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1134 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.




