41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ पोलीस अधिक्षक वंसत जाधव यांना भारत पोलीस सेवा प्रदान

पोलीस अधिक्षक वंसत जाधव यांना भारत पोलीस सेवा प्रदान

0
278

blank

भंडारा,दि.15ः- भंडारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांना १४ जानेवारी रोजी भारतीय पोलीस सेवेमध्ये सामावून घेण्यात आल्याने त्यांना आयपीएस दर्जा प्राप्त झाला आहे. राज्याचे पोलीस महासंचालकांनी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडे यासंदर्भात त्यांच्या नावाची शिफारस केली होती.त्यानुसार त्यांना आयपीएस दर्जा देण्याचा निर्णय १४ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केला.
वसंत उत्तमराव जाधव यांचा जन्म ०२ जुन १९७२ रोजी पुणे जिल्हयात झाला. महाराष्ट्र पोलीस दलात ०१/१०/२००२ रोजी नायब बेसीपी नंतर प्रोबेशनरी डिवाएसपी नांदेड येथे, सन २००३ ते २००४ या काळात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी एसडीपीओ पदाची पोस्टींग केली. २००५ ते २००८ पर्यत धर्मबाद एसडीपीओ वर्ष २००८ ते २०१० या काळात फलटन (सातारा) त्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक २०११ ते २०१४ दरम्यान भंडारा आणि उल्हासनगर (ठाणे) २०१४ ते २०१६ या कालावधी येथे कार्यरत होते. उप प्रा. कमिश्नर ऑफ पोलीस, सशस्त्र पोलीस, क्युआरटीटी नायगाव मुंबई सन २०१६ ते २०२० यां कालावधीत ते दिनांक १९/०९/२०२० पासुन पोलीस अधिक्षक भंडारा म्हणुन कार्यरत आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांनी भंडारा जिल्हयात मोठया प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे त्यामध्ये बंद जागेतील जुगार, सट्टा पटी, अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडत चाललेली तरुण पिढी अस्ताव्यस्त रहदारी व ग्रामीण भागात पोलीसाबद्दल असलेली नकारात्मक भावना यासारखे आव्हानेही मिळाली. अधिनिस्त अधिकारी/ कर्मचारी यांचेशी योग्य समन्वय साधुन व सगळयांना पोलीस कर्तव्याची नव्याने जाणिव करुन देत जिल्हयातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याकरीता नव्या दमाने कामास सुरुवात केली. अवैध ध्ांद्दया विरुध्द कडक मोहीम राबवुन भंडारा पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील सट्टा पट्टी व जुगाराचे, अमली पदार्थ असे अवैध धंद्दे संपुष्ठात आणले. त्यांच्या संकल्पनेतुन तयार केलेल्या कोरोना जनजागृती रथाच्या माध्यमातुन प्रत्येक ग्रामस्थांचा विश्वास बसेल. कारोना जनजागृती रथ तयार करण्यात आला. तसेच जिल्हयातील पुर्ण अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना संबधात मास्क, सेनीटॉयझर, औषधीचे वाटप करण्यात आले. तसेच नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन जिल्हयातील सर्वसामान्य जनते करीता ‘फिरते पथक व दोन मार्शल पथकांचे‘ उपक्रम राबविण्यात आहेत. त्यांच्या हस्ते सदर ‘फिरते पथक व दोन मार्शल पथकांचे‘ उद्घाटन करण्यात आले.

भंडारा जिल्हयात डायल ११२ चे ‘पोलीस आपल्या दारी‘ चे लोकार्पण करण्यात आले. वसंत जाधव जिल्हयात कार्यरत असतांना त्यांना पोलीस दलातील आयपीएस दर्जा मिळाला आहे. त्यांच्या कार्य तत्परतेमुळे यापूर्वी दि. २६/०१/२०२१ च्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते उल्लेखनीय सेवेबद्दल गुणवंत्त्तापूर्ण राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेला आहे. त्यांना भारतीय सेवा मध्ये समवुन घेण्यात आल्या बद्दल अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती व भंडारा जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आनंद व्यक्त केले आहे.

blank