
पुलगाव,दि.01ः- पुलगाववरून गोव्याला फिरायला गेलेल्या पाच युवकांना परतीच्या प्रवासात झालेल्या अपघातात पाच पैकी एका युवकाच्या मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना वाशिम जिल्हातील कारंजा लाड जवळ मध्यरात्री सुमारे तीन वाजताच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर घडली.
या अपघातातही पुलावरुन गाडी खाली पडली. त्यामधील एक युवकाचा कारंजालाड रुग्णालय मधे मृत्यू झाला. कारंजा
नागपूर हायवेवर ईसुजी कॅम्पर या गाडीमध्ये पाच युवक गोव्याला फिरायला गेले होते.ते गोव्यावरून येताना कारंजा लाड जवळ रात्री सुमारे तीन वाजताच्या दरम्यान गाडी अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. जखमी युवकांना अमरावती रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मृतक नानाजी उर्फ अनिल पाटेकर अन्य चार जखमी परवेज चिन्नेवार, विकास पाखरे,
प्रवीण बिरे, गावंडे यांना अमरावती येथे रुग्णालय मधे दाखल करण्यात आले .समृद्धी महामार्गाचे काम अपूर्ण असून रात्रीच्या वेळी या मार्गावर अपघात होत असल्याने हा मार्ग पूर्ण होत नाही तेव्हा पर्यंत बंद करण्यात यावा ,अशी मागणी होत आहे.





