41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ बुधवारला यवतमाळ येथे डॉ.पाडुरंग ढोलेंच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन

बुधवारला यवतमाळ येथे डॉ.पाडुरंग ढोलेंच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन

0
21

blank

यवतमाळ,दि.01ः-राज्यातील ओबीसी विद्यार्थी स्कॉलरशिपचे जनक ,ओबीसी विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रमाणे स्कॉलरशिप मिळाली पाहिजे या करता संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलन उभे करून राज्य सरकारला ओबीसी विद्यार्थ्यांकरता 100 कोटीची तरतूद करण्यास भाग पाडणारे ओबीसी क्रांतीदलाचे संस्थापक माजी आमदार स्व. डॉ.पांडुरंग ढोले यांच्या जयंतीनिमित्त 2 फेबुवारीला विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ परिसरात करण्यात आले आहे.
सदर जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर गोरे अध्यक्ष भारतीय पिछडा शोषित संघटन. तथा उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष माजी आमदार शरद पाटील सांगली, जनता दल सेक्युलरचे कार्याध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, महासचिव अविनाश निमकर नागपुर.डॉ.क्रांतीसागर पांडुरंग ढोले,ओबीसी नेते उत्तम भाऊ गुल्हाने ,भारतीय पिछडा शोषित संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य विलास काळे, सुनिता काळे विदर्भ अध्यक्ष ओबीसी जनमोर्चा तथा भारतीय पिछडा शोषित संघटन,आयोजक प्रफुल खेडकर जिल्हा संघटक भारतीय पिछडा शोषित संघटन ,ओबीसी मोर्चा शहर समन्वयक प्रदीप लोखंडे, चांदोरे नगर समन्वयक राजू बनारसे उपस्थित राहणार आहेत.

blank