
गोंदिया,दि.03ःयुक्रेन-रशिया युद्धामुळे Russia Ukrain War जिल्ह्यातील दोन विद्यार्थी व दोन कामगार युक्रेनमध्ये
अडकले होते.ते त्यांना सुरक्षीतरित्या रोमानिया येथे काढण्यात आले असून चारही देशात सुखरुप पोचले आहेत.मयूर व खुशाल हे दिल्लीला तर पवन व उमेंद्र मुंबईला पोचले असून त्यांना स्वजिल्ह्याकडे रवाना करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्लुयातील खुशाल पटले हा विद्यार्थी व पवन मेश्राम हा कामगार तसेच गोरेगाव तालुक्यातील उमेंद्र भोयर हा विद्यार्थी व मयूर नागोसे हा कामगार युक्रेनमध्ये अडकले होते.ते दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे चारही जणांना युक्रेयुक्रेनबाहेर रोमानिया येथे काढले असून ते सुरक्षीत भारतात दाखल झाले आहेत.तिरोडाच्या खुशाल पटले 2 मार्च रोजी दिल्ली येथे तर पवन व उमेंद्रला मुंबई येथे आणण्यात आले आहे. तर मयुर नागोसे सुध्दा पोचला आहे.




