
चंद्रपूर,दि.10:- स्थानिक एम.एस. ई.बी. वरकर्स फेडरेशन सोसायटी हॉलमध्ये आयटक संलग्न आल् इंडिया वर्किंग वूमन फेडरेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे कोल माईन संघटनेचे नेते कॉ. प्रदीप चिताडे यांनी भूषविले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयटकचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. प्रा.नामदेव कणाके,एम.एस. ई.बी. वर्कर्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष कॉ.प्रकाश वानखेडे, कॉ.कांता मेश्राम ,आशा वर्कर संघटनेच्या शहर सचिव सविता गटलेवार उपस्थित होत्या.
प्रारंभी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा वर्कर संघटनेच्या नेत्या कॉ.सविता गटलेवार यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान.कांता मेश्राम यांनी स्त्रीपुरूष समानतेची खरी सुरुवात स्वतःपासून आणि प्रत्येक घरातून व्हायला पाहिजे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कॉ.विनोद झोडगे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त बोलतांना सांगितले की अमेरिकेतील नुर्याक मध्ये वस्त्र उद्योगातील 15 हजार महिला कामगारांनी आपल्या हक्कासाठी 8 मार्च 1908 रोजी रस्त्यावर येत तीव्र आंदोलन केले होते त्यानंतर 1910 मध्ये जागतिक समाजवादी महिला परिषदे मध्ये क्लारा झेरिन या कम्युनिस्ट महिलेने हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून पाळण्यात यावा असा ठराव पारित केला होता तेव्हा पासून संपूर्ण जगभर 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून पाळण्यात येत आहे परंतु अजूनही महिला आपल्या अधिकार पासून वंचित आहेत तेव्हा आजच्या दिनाच्या महत्व लक्षात घेत भविष्यात आपली एकजूट कायम करत तीव्र संघर्ष करण्याचे आवाहन केले.चे अध्यक्ष कॉ.प्रदीप चीताडे यांनी स्त्रीपुरूष समानता, महिला सशक्तीकरण याविषयी भाष्य केले.या कार्यक्रमात अनेक महिलांचे सत्कार करण्यात आले,काही महिलांनी मनोगत व्यक्त करत क्रांती गीत सादर केले केले.कार्यक्रमाचे संचालन प्रमिला बावणे यांनी केले तर आभार वैशाली जुपाक्का यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या महिलांनी अथक परिश्रम घेतले.





