
तिरोडा-तालुक्यातील ग्राम पंचायत चांदोरी व अदानी फांऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनाच्या नाला सरळीकरण कामावर रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत रोगनिदान शिबिरात उपस्थित मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यात तापमान वाढू लागले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषत: कामावर असलेले मजूर उष्णतेच्या दहाकतेचा परिणाम होत आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरीता ग्राम पंचायत चांदोरी व अदानी फांऊडेशनच्या संयुक्त वतीने रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सरपंच अलकेश मिर्शा, डॉ. मनीषा कुंभारे, विवेक राऊत, स्वप्निल वाहने, संदीप अंबुले, राधेलाल बिसेन, शिवचरण धांडे, देवदास मराठे, सुनीता पटले, कमल पटले, दर्शन अंबुले, सुभाष अंबुले, मुनेंद्र नंदेश्वर, लोकेर्श वैद्य, रामरतन शिवणकर, जितेंद्र वासीसताले, भैयालाल बावीसताले, ताराचंद नखाते, बालचंद वैद्य व गावातील प्रमुखासह मजूर वर्ग उपस्थित होते.




