
गोंदिया,दि.26ः- तालुक्याअंर्तगत येत असलेल्या एकोडी गावातील नळ योजना मागील एक महिन्यापासुन बंद असल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.यासाठी ग्राम विकास अधिकारी ओ. एन. तुरकर यांना वारंवार नागरिकांनी सांगुन सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी आपली समस्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार ( बंटी ) पटले यांना निवेदन देऊन मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य दिपक रिणायत, शुभम बोदेले, माजी सरपंच रविकुमार (बंटी ) पटले, माजी ग्राम पंचायत सदस्य नामदेव बिसेन, विष्णुदयाल बिसेन, आरिफ़ पठाण, निरज रिणायत, राजु राऊत, बंटी रिणायत, निखिल भगत, जगदीश टेकाम, हेतराम पटले,प्रतिक रहांगडाले,रमेश हरिणखेडे, राजेशकुमार तायवाडे (पत्रकार) उपस्थित होते.




