41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ रोड बांधकामांवर अवैध रेतीचा वापर करूनही काम निकृष्ट दर्जाचे

रोड बांधकामांवर अवैध रेतीचा वापर करूनही काम निकृष्ट दर्जाचे

0
53

blank

सडक अर्जुनीृ –सडक अर्जुनी वरून रेंगेपार,शेंडा या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. सदर मार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. सडक अर्जुनी तहसील कार्यालय,ग्रामिण रूग्णालयासमोरून केसलवाडा या दोन किमी.मार्गावर रूंदीकरणाचे काम सुरू असून गोंदिया- कोहमारा मागार्पासून दिड किमी. लांब व रूंद १५ मीटर रोडाचे काम सुरू आहे. पण या दिड किमी रोडामध्ये अनेक विद्युत खांब उभे असून रात्री-बेरात्री हे विद्युत खांब दुर्घटनेला आमंत्रण देत आहेत.
सदर रोडाचे काम सुरू करण्याआधी रोडावर येणारे विद्युत खांब व सर्व्हे करणे आवश्यक होते.शासन नियमानुसार रोडाचे मधोमध येणारे विद्युत खांब हटविण्याकरिता होणार्‍या रोडाचे कामाचे अंदाजपत्रकात जोडले असतात.रोडाचे काम सुरू करण्याआधी विद्युत महामंडळाला पैसे भरून दिले की, विद्युत महामंडळ विद्युत खांब हटविण्याची प्रक्रिया करतो.पण या रोडाचे कामाचे कंत्राट असणार्‍या कंत्राटदाराने विद्युत महामंडळाला पैसे भरले नसल्याकारणाने विद्युत महामंडळाने विद्युत खांब हटविले नाही.सदर रोड १५ मीटर रूंद असून सुद्धा डिवॉयडर न बनविल्याने व दोन्ही बाजूला दुकाने असून ये-जा करणार्‍या नागरिक व वाहतुक करणार्‍यांना अपघाताचा सामना करावा लागतो.
या रोडाचे बांधकाम अताशा आशिर्वाद बिल्डकॉम नागपूर हे करित आहे.काम सडक अर्जुनी पासून शेंडा गाव १0 किमी. अंतरावर असून प.जि.मा.क्र. २९ पयर्ंत ६ किमी. रस्ता बांधकामासाठी शासनाने २८ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले होते.परंतू करारनाम्यात २२ कोटी रुपयांमध्ये काम घेतले. १३ नोव्हेंबर २0१८ रोजी या रोडाचे काम आरंभ झाले असून रस्ता बांधकाम पूर्ण होण्याची मुदत १३ नोव्हेंबर २0२0 पयर्ंत होती.या रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्यापासून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काम करतांनी कंत्राटदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे कॉक्रिंट रस्त्याची जाळी ४५0मिमी होती. परंतू कंत्राटदाराने व्हाईट टॉपींग कॉक्रिंट या संकल्पनेनुसार २५0 मिमी.ऐवढी जाळी केली आहे. २00मिमी जाळी कमी करून वास्तविक रोडाचे दोन्ही बाजूला नाल्या बनविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोणाचे घरात पाणी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम (प्रादेशिक) नागपूर विभागाचे मुख्य अभियंता यांनी मोक्यावर काम सुरू असतांनी काम न पाहता अतिरिक्त वाढीव प्रस्ताव दाखल करून ५ कोटी रुपयांची मान्यता दिली.
या बांधकामांवर संपूर्ण महाराष्ट्रात सन २0१८-१९-२0 या कालावधीत रेती घाटाचे लिलाव नसतांनी अताशा आशिर्वाद बिल्डकॉम यांचे मिक्सर प्लॉंन्ट सडक अजुर्नी ते केसलवाडा रोडाचे पूर्व दिशेला असून या मिक्सर प्लॉंन्टमध्ये मागिल तीन वर्षांत सौंदड येथील पिपरी घाट, सावंगी घाट,घाटबोरी घाट या तिन्ही घाटावरून दिवसाढवळ्या टिप्परने व मिनी ट्रकने रेतीची अवैध वाहतूक केली गेली व आजही सुरू आहे.
विशेष म्हणजे, सडक अर्जुनी तालुक्यातील एकही रेती घाट लिलाव झाले नव्हते. पण स्थानिक तहसिलदार यांचे कार्यालयासमोर मागिल तीन वर्षांपासून रोड,नालीचे बांधकाम सुरू असून सुद्धा रात्रीच्या वेळी नाली बांधकामांवर ट्रॅक्टरने अवैध रेती रोजच आणली जात असे. त्यावेळेस तहसिलदार डोळ्याला पट्टी बांधून कार्यालयात जात असत कां? कशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. सदर रोडाचे बांधकामांवर अवैध रेतीचा वापर करूनही काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

blank