33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ सीएसआर अंतर्गत रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट कडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक पुस्तके दान

सीएसआर अंतर्गत रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट कडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक पुस्तके दान

0
23

blank

गोंदिया,दि.31 : समाजात अनेक दानशुर संस्था/व्यक्ती कार्यरत असून त्या विविध सामाजिक कार्य, गरजुंना दान करणे, लोकांना मदत करीत असतात. अशीच दानशुर संस्था रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचेकडून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता 150 पेक्षा अधिक पुस्तके दान स्वरुपात प्राप्त झालेली आहे. त्यानिमित्ताने 31 मार्च रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ.अपुर्व पावडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीएसएम विभागप्रमुख डॉ.सुभाष ठाकरे, प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ.मनिष तिवारी, तसेच उपवैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय माहुले, प्रशासकीय अधिकारी संजय भोंडे उपस्थित होते.

रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता पुस्तके दान स्वरुपात प्राप्त झालेत. याकरीता गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई येथील समाजसेवा अधिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई चे राज्याध्यक्ष विजय गायकवाड यांनी विशेष मदत केली. तसेच या कामी समन्वयाची भुमिका समाजसेवा विभागातील मारोती कुचनकर, विक्रम लांजेवार यांनी पार पाडली. सदर कामात अरविंद शंभरकर, दिलीप ब्राम्हणकर, गोपाली खोटे, प्रेरणा धनवीर, अजय डोंगरे, नवनाथ महाजन व भुषण खांडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमात CSR चे महत्व याबाबत माहिती देण्यात आली. सदर फंडातून विविध गरजु रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना खुपच मदत होते. गोंदिया जिल्ह्यातील दानशुर संस्था/व्यक्ती यांनी पुढे येऊन गरजु लोकांना मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन विक्रम लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन ढोले, शैलेंद्र बन्सोड, मंजुषा शेंबेकर व हरिचंद्र कटरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विनोद जाधव, प्रविण डोंगरे, संदिप सोलंकी, प्रणय डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाकरीता छाया रामटेके व श्री.महावत यांनी सहकार्य केले.

blank