40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष खा. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा गोंदियात निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष खा. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा गोंदियात निषेध

0
76

blank

गोंदिया,दि.09ः– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील (सिल्वर ओक) निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचा तर्फे झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज शनिवारला(दि.09)गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर मुक आंदोलन करीत झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला.त्यानंतर घटनेच्या विरोधात घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोचला.दोषीवंर क़डक कारवाई करणयासंदर्भातील मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
blank यावेळी जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे,जि.प.गटनेते सुरेश हर्षे,म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी,गोंदिया शहर अध्यक्ष अशोक शहारे,युवक काँग्रेस अध्यक्ष केतन तुरकर,युवा नेते रविकांत बोपचे,डाॅ.योगेंद्र भगत,राजू.एन.जैन.सुनिल पटले,शैलेष वासनिक,विनोद हरिणखेडे,अविनाश काशीवार,प्रभाकर दोनोडे,नरेश भेंडारकर,रवी पटले,रमन उके,राजेश कापसे,प्रेम जायस्वाल,केवल बघेले,वाय.टी.कटरे,सी.के.बिसेन,नागरत्न बनसोड,अखिलेश सेठ,महेंद्र चौधरी,भृंगराज परशुरामकर,सतिश पारधी,नानु मुदलीयार,भगत ठकरानी,एकनाथ वहिले,चुटे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

blank