जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करुन पक्ष संघटन मजबूत करा – माजी आमदार राजेंद्र जैन

0
24

सालेकसा,दि.19ः-सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुद्वारा हॉल स्टेशन रोड, सालेकसा येथे माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक पार पडली.या बैठकीत प्रामुख्याने पक्ष सदस्यता नोंदनी व संघटनात्मक चर्चा व जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीची समिक्षा करुन पक्ष वाढीकरिता सूचना करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, सालेकसा तालुक्यातील पक्ष पराभवाची कारणे पदाधिकाऱ्यांनी शोधून काढली पाहिजेत, काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांवर मात करु. संघटनात्मक दृष्टीने पक्षाने सुरू केलेला जनतेशी संवाद व एक तास राष्ट्रवादीसाठी हा कार्यक्रम कार्यकर्ता व पदाधिकार्यांनी प्रत्येक महिन्याला आयोजीत करावा. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करुन पक्ष संघटना बांधण्याचे काम करावे. तालुक्यात जास्तीत जास्त सभासद नोंदणी करुन पक्ष मजबुत करा असे आवाहन श्री जैन यांनी केले. यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, दुर्गाबाई तिराले, प्रभाकर दोनोडे, गोपाल तिराले, बिसराम चर्जे, डॉ अजय तुमाटे, लक्ष्मण नागपुरे, रोहित बनोटे, निकेश गाढव, संतोष रहांगडाले, दौलत अग्रवाल, माधवराव शहारे, ओमकार रहांगडाले, रवींद्र कटरे, मायकल मेश्राम, रघुदास नागपुरे, रजत बडोले, प्रेमचंद लिल्हारे, जयेंद्र नंदेश्वर, जितेंद्र बडोले, संदीप शेंडे, किशोराव वानखेडे, माधवराव शहारे, हिरामण बडोले, ओमप्रकाश लांजेवार, शफिकभाई शेख, समीर कटरे, शांताराम मौजे, चंदू दोनोडे, हिवराज कुतीर, कमलेश लिल्हारे, ओंकार खोब्रागडे, संदीप मिश्रा, अजय उमाटे, पूजा वरकडे, कवलचंद दासरीया व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.