जिल्हा परिषदचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा लेखाअधिकारी बुरंडे पैसे घेताना कॅमेऱ्यात कैद!

0
146

बीड-: सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार कशा प्रकारे सुरू आहे. याचा जिवंत उदाहरण बीड जिल्हा परिषदेत पाहयाला मिळाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखाअधिकारी अ.व.बुरंडे यांचे पैसे घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून कारवाईची मागणी केली जात आहे.गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या फाईल पुढे सरकण्यासाठी अधिकारी सर्रास टेबल वरती पैशाची मागणी करतात व ते पैसे स्वीकारताना देखील दिसून येत आहेत. त्यामुळे नेमकं बीड जिल्ह्यामध्ये पैसे दिले शिवाय कुठली हि  फाईल पुढे सरकत नसल्याचे बोलले जात आहे.अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखाअधिकारी अ.व. बुरंडे यांचा प्रताप समोर आला आहे. फाईलवर पैसे ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही काही तरी द्यावं लागतं, असं म्हणत पैसे हातात घेऊन टेबलावर ठेवताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.एकूणच बीड जिल्हा परिषद मधील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून यासंदर्भात लेखाधिकारी अ.व. बुरांडे यांना विचारले असता ‘मी कधी कोणाकडून पैसे घेतले आहेत मला आठवत नाही असे बुरांडे यांनी सांगितले एकंदरीतच भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या या सर्व कार्यालयामध्ये अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.