33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय जेटली नारद मुनी बनू नका – जयराम रमेश

जेटली नारद मुनी बनू नका – जयराम रमेश

0
16

blank

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – संसदेच्या कामकाजात काँग्रेसपक्षामुळे नव्हे तर कॉंग्रेसच्या नेतृत्वामुळे अडथळे येत असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केल्यानंतर काँग्रेसने त्याला प्रतिउत्तर देत त्यांना नारद मुनी बनू नका चांगले अर्थमंत्री बना असा सल्ला दिला आहे.

काँग्रेस आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यामध्ये फुट टाकण्याचे काम जेटली करत असल्याचा आरोप करत पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी हे सर्व जेटली यासाठी करत आहेत, कारण त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवरील नियंत्रण गमावल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर एका पत्रकार परिषदेत रमेश यांनी जेटली यांचा उल्लेख नारदमुनी केला असून जेटली यांनी नारदमुनी बनून आग लावायची कामे करण्यापेक्षा चांगले अर्थमंत्री बनले पाहिजे.

रमेश यांनी पुढे म्हटले, काँग्रेस पक्ष आणि नेतृत्व यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. त्यात जेटली गैरसमज निर्माण करीत आहेत.

blank