कोल्हापुरात देशातील पहिले लीड बोटॅनिकल गार्डन

0
8

कोल्हापूर दि १४:– शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाकडून दुर्मिळ असणाऱ्या देश- विदेशातील वनस्पतींच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरणारे देशातील पहिले लीड बोटॅनिकल गार्डन (जैवविविधता पार्क) साकारण्यात आले असून शुक्रवारपासून हे गार्डन खुले केले जाणार आहे. उद्या सकाळी ११वाजता केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. परमजित सिंग, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. या उद्यानाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ‘देशातील पहिले लीड बॉटनिकल गार्डन’ म्हणून सन २००७ मध्ये घोषित केले होते. आता या गार्डनच्या माध्यमातून पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती, प्रजातींचे संवर्धन आणि या वनस्पतींचे नवीन उपयोगांबाबतचे संशोधन केले जाणार आहे.

विविध वनस्पतींबाबत शिक्षण तसेच वनस्पतींच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये प्रबोधन केले जाईल. गार्डनमध्ये सपुष्प, नेचेवर्गीय, पाम, आदी स्वरूपातील सुमारे 1133 वनस्पती आहेत. जगभरातील अनेक देशातील संशोधक कोल्हापूरात दाखल झाले असून या प्रकल्पासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले आहेत.