34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ आसोलीवासियासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली निःशुल्क पाणी टॅंकरची सोय

आसोलीवासियासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली निःशुल्क पाणी टॅंकरची सोय

0
115

blank

आमगाव,दि.12ः- दिवसेंदिवस उन्हाळ्याची दाहकता सतत वाढत असून गावखेड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे.त्यातच तालुक्यातील आसोली येथे सुध्दा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ लागल्याने गावातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या दोन युवकांनी स्वखर्चाने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ट्रक्टरवर पाण्याटी टाकी लावून निशुल्क पाणी देण्यास सुरवात केली आहे.आमगाव तालुका ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष भुमेश शेंडे व सामाजिक कार्यकर्ते मनोज हरिणखेडे यानी ही व्यवस्था आज 12 मे पासून सुरु केली असून त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.यावेळी माजी सरपंच रामेश्वर शेन्डे,दीनदयाल बघेले,माजी उपसरंपच आत्माराम तरोणे,रामचंद्र हरिणखेडे़,माजी तंटामुक्त अध्यक्ष शिवलाल कटरे,इशूनाथ उके,देवेंद्र पारधी,बालू हरिणखेडे़,डाकचंद हरिणखेडे़,टोपचंद कथलेवार,दुलिचंद कथलेवार, अनिल बघेले व समस्त गावकरी यांच्या उपस्थितीत या निशुल्क पाणीवाटप सेवेचा शुभारंभ करण्यात आला.आसोली व पाटिलटोला येथील नागरिकांना 10-15 दिवसापर्यंत निशुल्क पाणी पुरवठा केला जाणार आहे.

blank