43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे पावसळ्यापूर्वी पूर्ण करा आमदार – मनोहर चंद्रिकापुरे

मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे पावसळ्यापूर्वी पूर्ण करा आमदार – मनोहर चंद्रिकापुरे

0
47

blank

अर्जुनी/मोर,दि.21ः तालुक्यातील ग्राम बोळदे/करड व ताडगाव येथे मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्त्यांचे आमदार चंद्रिकापुरे यांचा हस्ते भूमिपूजन पार पडले.यावेळी बोलतांना कृषिमालाची वाहतूक करण्यासोबतच शेती यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी चांगल्या शेतरस्त्यांची आवश्यकता आहे.यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देऊन मंजूर पाणंद रस्ते पावसळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आमदार चंद्रिकापुरे यांनी दिले.
अर्जुनी/मोर तालुक्यातील ग्राम बोळदे/करड येथील रोहिदास राणे ते भूषण आरसोडी यांच्या शेतापर्यंत तसेच ताडगाव येथील रूपचंद नाकाडे ते मुखरू गहाणे यांच्या शेतापर्यंत, असे एकूण ४८ लक्षाचे मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्त्यांचे मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले की, शेती व शेतीपूरक उद्योग-व्यवसायांचा विकास होण्यासाठी पाणंद रस्त्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला चांगल्या शेतरस्त्यांची गरज आहे. मातोश्री पाणंद रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 15 जूनपर्यंत पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्यावे. ज्या गावात रोहयोच्या कामांवर मजुरांचा प्रतिसाद चांगला आहे, तेथे आवश्यकतेनुसार नवीन कामे हाती घ्यावीत. यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आर्थिक स्थैर लाभेल. आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे, हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी यशवंत गणवीर उपाध्यक्ष जि. प. गोंदिया,सविताताई कोडापे सभापती पं. स. अर्जूनी मोरगाव, पौर्णिमाताई ढेंगे जि. प. सदस्या, लोकपाल गहाणे तालुका अध्यक्ष राकाँप,होमराज पुस्तोडे उपसभापती प.स अर्जुनी मोरगाव, कुंदाताई लोगडे प.स. सदस्य, नुतनलाल सोनवणे पं. स. सदस्य विनोद मेश्राम तहसीलदार, विलास निमजे गट विकास अधिकारी, मीनाताई लंजे सरपंच बोळदे/करड, मनोज तुमडाम उपसरपंच, भूमेश्वर बोरकर सरपंच ताडगाव, दामोधर शहारे उपसरपंच, पुण्यशील टेंभुर्णी, माणिक मेश्राम, मंदाताई लंजे, गीताताई उईके, समर्था टेंभुर्णी, रसिका लंजे, एन.सी.रामटेके सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, सुधीर कापगते, महारु मडावी, व्यंकंट जांगडे, अशा नाकाडे, मनोहर पुस्तोडे, नितीन नाकाडे , तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

blank