34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ गडचिरोली शहरातील होणारा बालविवाह एक दिवसाआधी थांबविला ….

गडचिरोली शहरातील होणारा बालविवाह एक दिवसाआधी थांबविला ….

0
38

blank

गडचिरोली,दि.29: दिनाक 26/05/2022 रोज गुरुवार ला गडचिरोली शहरातील तेली वार्डात एक बालविवाह होणार आहे अशी तक्रार पोलीस स्टेशन गडचिरोली येथे करण्यात आली. लगेच सायंकाळी 8 वाजता पोलीस स्टेशन गडचिरोली, जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता बालिकेचे घर गाठले व बालकाची जन्म पुरावा तपासणी करून ,बालक 18 वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच बालिकेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले.

मुलिकडचे व मुलाकडचे हे दोन्ही मंडळी सुध्दा गडचिरोली शहरातील असून त्यांचा बाल विवाह दुसऱ्या दिवशी गडचिरोली येथे होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालिकेच्या घर गाठून मुलीच्या आईकडून मुलीचे 18 वर्ष होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांचे उपस्थितीत वधू पक्ष यांना एकत्र बसऊन बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायदा नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित कुटूंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, तसेच पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पूनम गोरे साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण मॅडम, दिनेश बोरकुटे जिल्हा समन्वक चाईल्ड लाईन, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, सामजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, अविनाष राऊत चाईल्ड लाईन टीम मेंबर, यांनी कार्यवाही केली.

बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्याकडे बलिकेला सादर करून हमीपत्र लिहून घेण्यात आले. 15 वर्ष 4 महिन वय असणाऱ्या बालिकेचा बालविवाह थांबवण्यात जिल्हा बाल संरक्षण टीम, पोलीस विभाग, चाईल्ड लाईन गडचिरोली यांना यश आले हे विशेष आहे.

अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री no,1098 या क्रमांक वर बाल विवाह बाबत संपर्क करावे.

blank