सडक अर्जुनी,दि.09ः- तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, खजरी/डोंगरगाव येथे वर्ग 8 वी तील “आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीतही तयारी केली.या परिक्षेसाठी 31 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.त्यांच्याकरीता NMMS परीक्षेचे आयोजन उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांच्या मार्गदर्शनात व प्राचार्य खुशाल कटरे यांच्या नियोजनानूसार, शिक्षणप्रेमी ए.डी.मेश्राम यांच्या वतीने विध्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तासिका सलग उन्हाळ्यात आयोजित करण्यात येत आहे.परीक्षापूर्व तयारी अतंर्गत उजळणी व्हावी यासाठी दोन्ही MAT व SAT पेपरच्या दोन दोन सराव परीक्षा घेण्याचे निश्चित केलेले आहे.