गोंदिया-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी यूनियन आयटक जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित सभा २५ जून रोजी कामगार भवन रामनगर गोदिया येथे आयोजित करण्यात आली होती.
या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शकुंतला फटींग होत्या. सभेला मार्गदर्शक म्हणून युनियनचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, आम्रकला डोंगरे, जीवनकला वैद्य, पोणीर्मा चुटे प्रामुख्याने उपस्थित होते. अतिथी म्हणून सुनिता मलगाम, बिरजूला तिडके, अर्चना मेर्शाम, लालेश्वरी शरणागत, काचंन लाडे, शुशिला फुडे, शामकला मसराम, थनुकला नागपुरे उपस्थित होते.
याप्रसंगी हौसलाल रहांगडाले यांनी अंगणवाडी कर्मचार्यांना प्रलबिंत समस्या आणी पुढील आंदोलन जिला अधिवेशन बाबद मार्गदर्शन केले. अंगणवाडी कर्मचारी यांचा प्रलबिंत प्रवास भत्ता, सीईबी प्रोत्साहन भत्ता, गणवेश, मोबाईल रिचार्ज थकीत असून प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून अद्यापही देण्यात आलेले नाही. या बाबद निवेदन देण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यव्यापी मागण्यांना घेवून ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदवर प्रचंड मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा अधिवेशन सडक अजुर्नी या ठिकाणी घेण्यात येणार असेही ठरविण्यात आले. सभेचे प्रास्ताविक पौर्णिमा चुटे यांनी तर आभार बिरजूला तिडके यांनी मानले