32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ कृषी सभापती कुथेनी घेतला पहिल्याच सभेत कृषी विभागाचा आढावा

कृषी सभापती कुथेनी घेतला पहिल्याच सभेत कृषी विभागाचा आढावा

0
59

blank

गोंदिया,दि.29ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीची बैठक तब्बल अडीचवर्षानंतर आज कृषी व पशुसंवर्धन विभागाचे नवनिर्वाचीत सभापती रुपेश(सोनु)कुथे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी प्रमोद मडामे यांच्यासह सर्व पंचायत समिती स्तरावरील कृषी अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कृषी समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.भातपेरणी व लागवडीचा हंगाम असल्याने कृषी सभापती कुथे यांनी पिकपरिस्थितीचा आढावा यावेळी घेतला.सभेला कृषी समितीचे सदस्य असलेले जि.प.सदस्यामध्ये शांता देशभ्रतार,रितेशकुमार मलघाम,छाया नागपूरे,गिता लिल्हारे,किरणकुमार पारधी,सुधा रहागंडाले,चंद्रकला डोंगरवार,राधिका धरमगुळे,पौर्णिमा ढेंगे व राजेंद्र गौतम उपस्थित होते.

blank