
गोंदिया,दि.6 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, गोंदिया कार्यालयाच्या वतीने 19 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फुलचूर टोला, गोरेगाव रोड, गोंदिया येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. इयत्ता दहावी व बारावी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केले आहे.