33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ पालक सचिव श्याम तागडेसोबंत कास्ट्राईब संघटनेची बैठक

पालक सचिव श्याम तागडेसोबंत कास्ट्राईब संघटनेची बैठक

0
24

blank

गोंदिया,दि.08ः- कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा गोंदियाच्या वतीने 7 जुलैला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालक सचिव श्याम तागडे  यांच्या सोबत  कर्मचारी व विद्यार्थांच्या मागण्यासंबधी  सकारात्मक चर्चा करण्यात आली.
   1 ली ते 8 वी तील  इतर मागासप्रवर्गातील  विद्यार्थी- विद्यार्थिनी, अनुसूचित जमाती प्रवर्गातील  विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना शिष्यवृत्ती मिळत असून  त्याच धर्तीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील 1ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनी यांना  शिष्यवृत्ती देण्यात यावी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे, मागासवर्गीय  कर्मचाऱ्यांचा सरळ सेवा भरतीतील अनुशेष लवकर भरण्यात यावा,रिक्त पदे भरण्यात यावी व इतरही मागण्यांवर साहेबांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
      सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ते पाऊल उचलणार असल्याचे आश्वासन साहेबांनी कास्ट्राईबला दिले. यावेळी साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटने चे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे जिल्हा मुख्य संघटन सचिव हितेंद्र  रामटेके , गेडाम सर तसेच इतर  पदाधिकारी उपस्थित होते.

blank