
-समता सैनिक दल केंद्रीय संघटक मार्शल सुनिल सारीपुत्त सर यांचे प्रतिपादन
वर्धा: संबंध देश धार्मिक उन्मादाच्या,फँसिझम सारख्या भयावह परिस्थितीतून जात आहे.आज सर्वच पातळीवर विचारवंतांचा ,विचारांचा आणि वैचारिकतेचा गळा दाबून टाकण्याचे षडयंत्र वर्तमान राजकीय आणि धार्मिक समाजव्यवस्था करु पाहत आहे. अशा भयावह परिस्थितीत आपल्याला मुकदर्शक बनून राहता येणार नाही. यासाठी आंबेडकरी विचारांवर प्रामाणिक व निष्ठेने काम. करणाऱ्या देशातील सर्व सामाजिक धार्मिक व राजकीय पक्ष,गट, संस्था,समित्या,संघटना यांनी या विषमतावादी व्यवस्थेशी संघटीत होऊन लढा देण्याची गरज आहे,असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक मार्शल सुनिल सारीपुत्त यांनी केले.
ते समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटच्या वतीने चेतना शिक्षण महाविद्यालय सावंगी(मेघे)रोड वर्धा येथे आयोजित विचार संमेलन -२०२२ च्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या विचार संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद सवाई हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख मार्शल प्रकाश दार्शनिक आंबेडकरी विचारवंत मार्शल एन.व्ही. ढोके ,मार्शल किशोर चहांदे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य समता सैनिक दल,प्रा.डॉ. विनोद राऊत,असोसिएट प्रोफेसर कमला नेहरू महाविद्यालय नागपूर,प्रा.प्रमोद नारायणे यशवंत महाविद्यालय वर्धा,प्रा.सुनिल तोतडे,कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय ,वर्धा हे प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यानंतर प्रथम सत्रामध्ये”द्वितीय विश्वयुद्ध और डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस किताब की मौलिकता”या विषयावर मार्शल प्रकाश दार्शनिक सर तसेच डॉ. विनोद राऊत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या सत्राची भुमिका समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे यांनी मांडली .सत्राचे संचालन तालुका संघटक मनोज थुल यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिकजी गाडगे यांनी मानले.
द्वितीय सत्रामध्ये “पालीही संस्कृत भाषा की जननी है”,किताब से संस्कृत के श्रेष्ठता की पोल खोल”,या विषयावर मार्शल एन. व्ही.ढोके सर यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच प्रा.प्रमोद नारायणे यांनीसद्धा सविस्तर मार्गदर्शन केले.या सत्राचे प्रास्ताविक जिल्हा कोषप्रमुख धम्मपाल ढोबळे यांनी केले.सुत्रसंचालन सुनिल ढाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रितीताई आष्टेकर ह्यानी मानले.
तृतीय सत्रामध्ये “आंबेडकरी संघटनाओंके एकता की वास्तविकता और हम”या विषयावर मार्शल सुनिल सारिपुत्त तसेच मार्शल किशोर चहांदे ,प्रा.सुनिल तोतडे यांनी सुदर अशी विषयाची मांडणी करून मार्गदर्शन केले.या सत्राचे प्रास्ताविक मनोज थुल यांनी केले तर संचालन सुमनताई बागडे व उपस्थितांचे आभार वंदनाताई वासनिक ह्यांनी मानले.
या संमेलनाला यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा विभाग प्रमुख प्रदीप कांबळे,तालुका संघटक मनोज थुल,मार्शल अमोल ताकसांडे, मार्शल चंदु भगत, दिपक हुके,ज्येष्ठ मार्गदर्शक डंभारे पहेलवान,दिंगाबर लांबे,चंद्रकलाताई पखाले,ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिकजी गाडगे,प्रितीताई आष्टेकर,नालवाडी शाखा संघटिका सुमनताई बागडे,रमाई नगर शाखा संघटिका वंदनाताई वासनिक, सिंदी(मेघे)शाखा संघटिका सुनिताताई डंभारे,मार्शल पप्पू पाटील,लिला सिरसाम,जया ऊईके,श्वेता वासनिक, सुनिल ढाले,दिक्षांत वासनिक, सुमनताई फुलझले,फहिम काझी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.





